जम्मूतील प्रसिद्ध वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी रोज फक्त 50000 भाविकांनाच दर्शन घेता येईल. असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने सोमवारी दिले. पर्वतावर असलेल्या या मंदिर परिसरात वाढत्या गर्दीमुळे अप्रिय घटना घडू नयेत यासाठी हे पावूल उचलल्याचे लवादाने स्पष्ट केले. फक्त पादचारी आणि बॅटरीवर चालणाऱ्या नव्या कारसाठी नवा मार्ग २४ नोव्हेंबर पासून खूळ केला जाणार असल्याचेही लवादाने जाहीर केले. भाविकांना त्रास कमी व्हावा आणि वाढत्या गर्दीमुळे आपत्कालीन घटना टळाव्यात यासाठी लवादाने पुढाकार घेवून हा निर्णय घेतला आहे. त्यात गर्दीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच नव्या मार्गाचाही समावेश आहे. नव्या मार्गावर घोडे आणि खेचरांना बंदी घालण्यात आली असून हळूहळू जुन्या मार्गावरही या प्राण्यांची मदत घेणे कमी केले जाईल. वैष्णोदेवी भानाच्या परिसरात 50000 पेक्षा जास्त लोक राहू शकत नाहीत, म्हणून भाविकांना अर्धकुंवारी किंवा कटरा गावात थांबवले जाईल.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews